मेट्रोतल्या बायका :लेख ३९)वास्तव
मेट्रोतल्या बायका :लेख ३९)वास्तव वास्तव -रश्मी घटवाई आपल्या गाण्याची पुरेशी तयारी झाल्याची खात्री पटल्यावर श्रध्दानं आपलं गाणं आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलं आणि लगोलग आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवरच्या आपल्या अकाउंटवर टाकलं. लगोलग आपल्या सेल्फीज घेऊन त्याही तिनं आपल्या अकाउंटवर टाकल्या.सध्या सुट्या सुरु होत्या. दहावी-बारावीचे निकाल लागायला सुरुवात झाली होती."आता काही दिवसांतच आपल्या बीएच्या प्रथम वर्षाचा निकाल जाहीर होईल,मग पुन्हा कॉलेज सुरु होईल,तोवर धमाल करावी झालं !" श्रध्दानं विचार केला होता."गेल्या वर्षी यांच दिवसांत आपल्याहीकडे निकालाची धामधूम होती. मंतरलेले दिवस होते ते. निकाल लागेतो नुसती हुरहूर वाटत होती,जिवाची किती घालमेल चालली होती. बारावीचा आपल्या मनासारखा निकाल लागला,सगळ्या विषयांत भरघोस गुण मिळवले म्हणून आपल्यावर नातेवाईक, मित्रमैत्रिणी, ओळखीचे लोक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत होता,आई बाबांनी खुश होऊन एक महागडा स्मार्ट फोन घेऊन दिला होता,ज्याचा आपण त्या दिवसापासून आजतागायत पुरेपूर उपयोग करीत आलोय. कित्ती कित्ती चांगले आहे...