Posts

मेट्रोतल्या बायका :लेख ४२)मळभ

मेट्रोतल्या बायका :लेख ४२)मळभ मळभ ​​ -रश्मी घटवाई "अहो,ऐकलंत का?आपण आज जरा भटकून येऊया का?"सुचेता ताईंनी निशिकांतना म्हटलं."कित्येक दिवसांत घरापासून लांब गेलोच नाही.माझी सगळी कामं आटोपलीत.तुम्ही म्हणत असाल तर पानं घेते,म्हणजे जेवून,वामकुक्षी घेऊन आणि चहा घेऊन कुठेतरी जाऊन येता येईल." निशिकांतनी काहीच उत्तर दिलं नाही,म्हणून  सुचेताताईंनी  स्वयं पाकघरातून बाहेर डोकावून पाहिलं.निशिकांत बाल्कनीतल्या त्यांच्या खुर्चीत बसून नेहेमीप्रमाणे पक्षीनिरीक्षण करण्यात रमलेले होते.त्यांच्या घरासमोर जांभळाचं मोठं झाड होतं,त्यावर चिमण्या,कावळे,मैना यांचं वास्तव्य असायचं. त्या पक्ष्यांना पिण्यासाठी म्हणून त्यांनी  आपल्या बाल्कनीत  मातीचं पसरट भांडं भरून पाणी ठेवायला सुरुवात केली आणि जांभळं खाऊन सगळे पक्षी नेमानं त्यांच्याकडे पाणी प्यायला येऊ लागले. मग थोडे धिटाईनी रेंगाळू लागले.त्यांच्यासाठी मग त्यांनी मूठमूठ धान्य पण  ठेवायला सुरुवात केली आणि मग त्यांच्या त्या छोट्या बाल्कनीत पक्ष्यांचा राबता वाढला."अगं,मला पक्ष्यांची भाषा येणार बहुतेक काही दिवसांतच. कृतज्ञतेनं   त...

मेट्रोतल्या बायका :लेख ४१)प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी

मेट्रोतल्या बायका :लेख ४१)प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी प्रॉब्लेम ऑफ प्ले न्टी   -रश्मी घटवाई  "संपदा,तुझ्या खोलीत विनाकारण पंखा सुरु आहे,खोलीत कुणीही नाहीये, तो  पंखा बंद कर पाहू आधी ! " वरदा बैठकीच्या खोलीतून जोरात ओरडून संपदाला म्हणाली. प्रत्युत्तर आलं नाही,म्हणून तिनं अंमळ रागावून  संपदाला  पुन्हा  एकदा तेच   सांगितलं.  "अगं दोन मिनिटं पंखा सुरु राहिला तर काही बिघडत नाही. आई नी  मला हे कपडे वॉशिंग मशिनमध्ये धुवून वाळवायला सांगितले होते,तेच काम करतेय मी!आणि एवढंच खटकतंय तर स्वतः उठून जरा बंद कर ना पंखा!"संपदानं बाल्कनीतून चिडून उत्तर दिलं आणि ती पुन्हा बाल्कनीतल्या दोरीवर कपडे वाळत घालण्याच्या कामात गुंतली. "मी पण वीज-पाण्याची  बिलं  ऑनलाईन भरण्याचं, आईनी सांगितलेलं च काम करतेय." वरदा म्हणाली.   "अगं,अगं,किती भांडाल...जुळ्या बहिणी आहात,इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहात,असं कुणी म्हणेल?"आई पोळ्या करता करता स्वयंपाकघरातून बाहेर डोकावली."आता पटापट आवरा,तुम्ही दोघींनी तुमच्या दोन मैत्रिणींना जेवायला बोलाव...

मेट्रोतल्या बायका :लेख ४०)अतिथी

मेट्रोतल्या बायका :लेख ४०)अतिथी अतिथी   - रश्मी घटवाई  "आई,तुला माझी दहावीतली ती मैत्रीण, कृत्तिका  आठवते का?"कीर्तीनी आईला विचारलं.आईनं स्मृतीला ताण दिला.   " कृत्तिका?अच्छा,ती का,जी दहावीत शाळेत पहिली आली होती?सात आठ वर्षांपूर्वी आपण दोघी मॉलमध्ये गेलो होतो,तेव्हा  ती  आणि तिची आई आपल्याला भेटल्या होत्या...तीच ना ?" आईनं म्हटलं, " ते लोक इथून बदलून गेले, तिनी तिथूनच इंजिनिअरिंग केलं असं मागे तूच मला सांगितलं होतंस ." "म्हणजे आम्ही शाळेतल्या मैत्रिणी अजूनही एकमेकींच्या संपर्कात आहोत.. कृत्तिका पण माझ्याशी नेहेमी बोलत असते,फार कशाला,मी जेव्हा बंगलोरला ह्या नोकरीच्या ट्रेनिंगसाठी महिनाभरासाठी गेले होते, तेव्हा पर्यायी व्यवस्था होईतो एक दिवस तिच्या रूमवर तिच्या इतर रूममेट्ससह राहिलेही होते."  कीर्तीनी आईला   सांगितलं." तिला एकटीलाच दोन-तीन दिवस मुंबईला यायचंय.मी तुमच्या घरी  दोन-तीन दिवस राहिले,तर चालेल का,असं सारखी फोन करून विचारतेय.काय कळवू तिला ते सांग !"  कीर्तीनी आईला विचारलं.आई बुचकळ्य...

मेट्रोतल्या बायका :लेख ३९)वास्तव

मेट्रोतल्या बायका :लेख ३९)वास्तव वास्तव   -रश्मी घटवाई  आपल्या गाण्याची पुरेशी तयारी झाल्याची खात्री पटल्यावर श्रध्दानं आपलं गाणं आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलं आणि लगोलग आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवरच्या आपल्या अकाउंटवर टाकलं. लगोलग आपल्या सेल्फीज घेऊन त्याही तिनं  आपल्या अकाउंटवर टाकल्या.सध्या सुट्या सुरु होत्या. दहावी-बारावीचे निकाल लागायला सुरुवात झाली होती."आता काही दिवसांतच आपल्या बीएच्या प्रथम वर्षाचा निकाल जाहीर होईल,मग पुन्हा कॉलेज सुरु होईल,तोवर धमाल करावी झालं !" श्रध्दानं विचार केला होता."गेल्या वर्षी यांच दिवसांत आपल्याहीकडे निकालाची धामधूम होती. मंतरलेले दिवस होते ते. निकाल लागेतो नुसती हुरहूर वाटत होती,जिवाची किती घालमेल चालली होती. बारावीचा आपल्या मनासारखा निकाल लागला,सगळ्या विषयांत भरघोस गुण मिळवले म्हणून आपल्यावर नातेवाईक, मित्रमैत्रिणी, ओळखीचे लोक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत होता,आई बाबांनी खुश होऊन एक महागडा स्मार्ट फोन घेऊन दिला होता,ज्याचा आपण त्या दिवसापासून आजतागायत पुरेपूर उपयोग करीत आलोय. कित्ती कित्ती चांगले आहे...

मेट्रोतल्या बायका :लेख:३८)दीपशिखा

मेट्रोतल्या बायका :लेख:३८)दीपशिखा दीपशिखा  -रश्मी घटवाई  वसुधाअक्कांच्या मोबाईलची बेल सारखी वाजू लागली,तेव्हा आपली गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून  वसुधाअक्कांनी फोन उचलला . "वसुधाअक्का बोलताहेत का?मला जरा त्यांच्याशी महत्वाचं काम होतं.याआधी दोनतीनदा फोन केला,पण कुणी उचलला नाही.... "    "हं मघा बऱ्याच ट्रॅफिक मधून चालवत होते गाडी,म्हणून नाही उचलता आला फोन.आता बाजूला लावलीये गाडी.बोला !" वसुधा अक्का  म्हणाल्या.गाडी चालवताना फोनवर बोललं तर लक्ष विचलित होतं अपघाताचा धोका संभवतो,म्हणून त्या कटाक्षानं फोन घेत नसत.एकदा आपल्या कामाच्या जागी किंवा गर्दी नसलेल्या ठिकाणी पोहोचल्या,की मग त्या बोलायचं राहिलेल्या फोनवर पुन्हा संवाद साधत . "मॅडम मी जागृती बोलतेय.आम्ही दुसऱ्या राज्यातून मुंबईत आमची जुनी गाडी आणतोय कारण  आम्ही दुसऱ्या राज्यातून इथे मुंबईला बदली होऊन येतोय . पण इथे त्या  गाडी ची नोंदणी करण्यात खूप अडचणी येताहेत.कुणी तरी आम्हाला तुमचं नाव सुचवलं.पण तुम्ही मोठया लोकांच्या,मोठ्या गाडयांची कामं करता ,कॉर्पोरेट्स साठी काम...

मेट्रोतल्या बायका :लेख:३७)कुंपण

मेट्रोतल्या बायका :लेख:३७)कुंपण कुंपण  -रश्मी घटवाई हातातला कुरडयांचा साचा बाजूला ठेवून दमलेल्या गीतानं अंमळ विश्रांती घेतली. थोड्या वेळापूर्वी गच्चीवर ऊन चांगलं चटचटत होतं.पाऊस सुरु होण्यापूर्वी उन्हाळ्यातली वाळवणाची कामं व्हायला हवीत म्हणून तिनं निगुतीनं तीन दिवस गहू भिजत घातले होते.ते निगुतीनं वाटून,हिंग-मीठ घालून त्याचा चीक शिजवला होता आणि आता शेवपात्रातून त्याच्या कुरडया पाडण्यात तिची सगळी सकाळ सत्कारणी लागली होती.उरलेल्या थोड्याच सत्वाच्या आता शेवटच्या कुरडया घालून झाल्या की जरा आराम करूया,भाजी पोळी सकाळीच करून ठेवलीये,त्यामुळे जेवून थोडीशी विश्रांती घेऊया."विचार करता करता गीताची नजर आभाळाकडे गेली.तिच्या बंगल्यातल्या गच्चीवरच्या मघा निरभ्र असलेल्या आकाशाच्या तुकड्यात काही चुकार ढग आलेले दिसत होते.तिचा नवरा,मुलं सकाळीच कामावर गेली होती.ते परतायच्या आत,कुरडया वाळल्या की तळून,सगळं साग्रसंगीत  स्वयंपाक-पाणी तिला करायचं होतं."खवय्याचं कुटुंब असल्यामुळे हे सगळे प्रकार करायला हुरूप येतो खरा!" ती स्वत:च्या मनाशीच समाधानानं हसली.  ...

मेट्रोतल्या बायका :लेख:३६)त्रिशंकु

मेट्रोतल्या बायका :लेख:३६)त्रिशंकु त्रिशंकु   -रश्मी घटवाई  शरयुचं विमान मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर उतरलं. सामानासह ती बाहेर आली,  तेव्हा ऐन दुपार असल्यामुळे महानगरात ऊन रणरणत होतं.बाहेर क्षणभर वावरणं सुद्धा कठीण होत होतं.उष्म्यानं जिवाची काहिली होत होती.त्यात हवेतल्या दमटपणामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या.आधीच  ठरवलेल्या  टॅक्सीत बसून आता तिला गोरेगावला मावसबहिणीकडे जायचं होतं. नद्या, पाणी या विषयावर आयोजित दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी म्हणून ती मुंबईत आली होती.याच विषयावर नुकतीच तिनं अमेरिकेतल्या नामवंत विद्यापिठातून डॉक्टरेट मिळवली होती आणि  जलविशेषज्ञ या नात्यानं  तिनं सिंगापूरमध्ये नुकतंच काम केलं होतं.ह्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी विशेष आमंत्रितांपैकी ती एक होती.दोन दिवसांनी परिषद सुरु होणार होती,पण जेट लॅग, जमलं तर पर्यटक म्ह्णून थोडंसं मुंबई दर्शन,आपल्या संस्कृतीचा शोध घेणं म्हणून तिनं दीड दिवस आधी मुंबईत पाऊल ठेवलं होतं. मुंबईतल्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा होत्या,माणसांची गर्दी हो...