मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख ५:पास्ता पिझ्झा बर्गर
मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला :लेख ५:पास्ता पिझ्झा बर्गर
पास्ता पिझ्झा बर्गर
-रश्मी घटवाई
मनालीनं घड्याळाकडे नजर टाकली तेव्हा आजही आपल्याला घरी पोहोचायला चांगलाच उशीर होणार ,हे तिला कळून चुकलं.त्या आर्किटेक्चरल ड्रॉइंग्जना पूर्ण करायला अजून एक तासभर तरी सहज लागणार होता.ज्या एका फ्लॅटच्या रिनोव्हेशनवर ती काम करत होती,ते काम जर का त्या क्लायंटला आवडलं तर त्याच्या आणखी दोन नव्या फ्लॅट्सच्या इंटिरियर डेकोरेशनचं काम पण मनालीच्या आर्किटेक्चरल फर्मला मिळण्याची शक्यता होती.त्यामुळे कामात अजिबात कुचराई नको म्हणून मनालीनं कुठल्या ज्युनियर आर्किटेक्टवर नं विसंबता जातीनं त्या कामात लक्ष घालायचं ठरवलं होतं.फार तोडफोड नं करता,क्लायंटला अपेक्षित असलेला नव्या जुन्याचा संगम साधून आहे ती जागा आणखी छान कशी करता येईल ,याच्या अनेक कल्पना तिला सुचू लागल्या,तेव्हा तिनं त्या कामात स्वत:ला पूर्णपणे झोकून दिलं .
मनालीला सकाळी पहिल्यांदा त्या क्लायंटचा राहत्या जागेची दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्याबाबत आणि जमल्यास लगोलग साईट व्हिजिट करण्यासाठी विचारणा करणारा फोन आला,तेव्हा एकदोन ज्युनियर सहकाऱ्यांना बोलावून घेऊन तिनं ताबडतोब क्लायंटची गाठभेट घेतली होती,पण त्या नादात काहीही नं खातापिता ती तशीच घराबाहेर पडली होती."नाश्ता -जेवण वगैरे करायला कुणाला वेळ आहे इथे !आपल्या क्षेत्रात इतकी जीवघेणी स्पर्धा आहे,की वेळ पाळली नाही,तर ते प्रोजेक्ट आपल्या हातून गेलंच समजा!दुसरे आर्किटेक्ट संधीची वाट बघतच असतील!जेवता काय,दुपारी पण येईल!"असा विचार करत मनालीनं कामाला प्राधान्य दिलं.आज अजून आईचा फोन आला नाही,नाहीतर तिनं पहिले विचारलं असतं ,काही खाल्लं आहेस ना?जावईबापू आणखी दोन महिने त्यांच्या ऑफिसच्या प्रोजेक्टसाठी युरोपमध् ये रहाणार आहेत;याचा अर्थ तू स्वत:ची आबाळ करावीस असा होत नाही!आणि काय गं तुमची ही नस्ती फॅडं एकेक!डबल इन्कम नो किड्स !डिंक म्हणे!आईचा त्रागा रास्त आहे म्हणा ,पण तिला काय ठाऊक की मुंबई नावाच्या या महानगरात पैसे टाकला की बाकी सगळं काही मिळतं ;एक वेळ तेवढा मिळत नाही!
"एक व्हेज बर्गर और कॉफी प्लीज !"आपल्या ऑफिसमध्ये शिरल्या-शिरल्या मनालीनं घाईघाईनं बाजूच्या पिझ्झा जॉईन्टला फोन केला.तो पिझ्झा जॉईन्ट मनाली आणि त्या ऑफिस कॉम्प्लेक्स मध्ये काम करणाऱ्या तिच्यासारखाच बहुतेकांच्या जिवावर भरभराटीला आला होता.मग दुपारच्या जेवणात पास्ता आणि रात्री काम संपायच्या सुमाराला पिझ्झा !एक के साथ एक फ्री असेल तर मग काय,मज्जा!पण हे आईला कळता उपयोगी नाही!पास्ता पिझ्झा बर्गर ?हे काय खाणं आहे ?अगं यातून तुमच्या शरीराला पुरेशी पोषणमूल्यं तरी मिळतील का?एखादेवेळा ठीक;पण हे रोज खाणार असाल तर कसं व्हायचं तुमचं ?आईचा आवाज, तिचा त्रागा,तिचा प्रत्यक्ष फोन नं येताही अप्रत्यक्षपणे तिच्या कानात गुंजला !मनातल्या मनात आईची क्षमा मागून, मनात उमटलेली अपराधीपणाची रेघ पुसून मनाली पुढ्यातल्या व्हेज बर्गरवर तुटून पडली!
***************************** ****************************** *****
"अम्मा ,व्हॉट इज धिस !आय
अॅम नॉट अ स्मॉल किड्!आय
अॅम टर्निंग सिक्सटीन !ऑल माय फ्रेण्ड्स आर कमिंग फॉर माय बर्थडे पार्टी
अॅ
ण्ड
यू आर
मेकिंग इडली
अॅ
ण्ड
डोसई!माझे सगळे मित्र-मैत्रिणी आज माझ्या वाढदिवसाला येताहेत आणि तू चांगलं काही करायच्या ऐवजी इडली -डोसे बनवते म्हणजे कहर झाला !तरी बरं रोज तेच खातो!ऑर्थोडॉक्स कुठली!आपण चेन्नई मध्ये जरी राहत असलो,आपण तामिळ असलो ;तरी माझे सगळे
मित्र-मैत्रिणी काही तामिळ नाहीत!आणि आम्हाला जरा एन्जॉय करू दे!आम्ही जरा रोजच्यापेक्षा वेगळं ,मॉडर्न खाणं खाऊ !जसं की पिझ्झा ,पास्ता ,बर्गर ,कोक वगैरे!"लेकीनं थयथयाट आरंभला तेव्हा सुधाला कळेचना आपलं काय चुकलं !ऑर्थोडॉक्स आणि मॉडर्न असणं यात चेन्नईचा ,तामिळ असण्याचा काय संबंध !मोठ्या कौतुकानं तिनं लेकीला सोळाव्या वाढदिवसासाठी म्हणून आणलेल्या महागड्या कांजीवरम साडीचा बॉक्स उघडण्याचं काही तिला धाडस झालं नाही. तंग , तोकड्या कपड्यांत वावरणाऱ्या लेकीनं भराभरा आपल्या मित्र-मैत्रीणीना शहरातल्या महागड्या हॉटेल मध्ये अमुक इतके वाजता या म्हणत मेसेजेस केले आणि त्या महागड्या हॉटेलमध्ये लगोलग टेबलंपण आरक्षित केली!
'मेन्यू ?'पलीकडून पृच्छा झाली!पिझ्झा ,पास्ता ,बर्गर ,केक अॅ
ण्ड कोक ! लेकीनं सहज स्वरात उत्तर दिलं .सुधा दिंगमूढ झाली . चेन्नईसारखं महानगर ऑर्थोडॉक्स आणि मॉडर्न असे दोन समांतर विचार-प्रवाह घेऊन चालू लागलं !
________________________________________________________________________
Comments
Post a Comment