मेट्रोतल्या बायका :लेख:३२)ट्रॅफिक जाम
ट्रॅफिक जाम -रश्मी घटवाई कल्पना त्या स्वयंचलित दुचाकी वाहनांच्या अतिभव्य शोरुमसमोरच्या रांगेत उभी राहिली,तेव्हा तिच्या समोर किमान वीस पंचवीस माणसं तरी आधीपासून उभी राहिलेली होती आणि तिच्या मागेही अवघ्या दहा मिनिटांत तेवढीच गर्दी झालेली होती. तिला गंमतच वाटली. ते शोरूम अद्याप उघडलं पण नव्हतं,मात्र आज आणि उद्या स्टॉक क्लिअरन्स सेल अंतर्गत त्या शोरूममध्ये उपलब्ध असलेल्या स्वयंचलित दुचाकी वाहनांवर घसघशीत दहा हजार रुपयांची सूट देऊ करण्यात आली होती.वर्तमानपत्रांत त्यासंबंधीच्या मोठाल्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या,दुकानाच्या आजूबाजूलाही मोठाल्या होर्डिंग्जवर दहा हजार रुपयांच्या सवलती बद्दलचा मजकूर सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.त्यामुळे जणू काही वाहन फुकटच मिळत असल्यागत तिथे लोकांनीं गर्दी करायला सुरुवात केली होती.तसंही मुंबई तल्या त्या रस्त्यावर खूप मोठ्या संख्येत मोटारगाड्यांच्या आणि मोटर सायकल,स्कुटर या स्वयंचलित दुचाकी वाहनांच्या अतिभव्य आणि एकमेकांशी प्रचंड स्पर्धा करणाऱ्या शोरूम्स होत्या.साहजि...