Posts

Showing posts from May, 2017

मेट्रोतल्या बायका :लेख:३७)कुंपण

मेट्रोतल्या बायका :लेख:३७)कुंपण कुंपण  -रश्मी घटवाई हातातला कुरडयांचा साचा बाजूला ठेवून दमलेल्या गीतानं अंमळ विश्रांती घेतली. थोड्या वेळापूर्वी गच्चीवर ऊन चांगलं चटचटत होतं.पाऊस सुरु होण्यापूर्वी उन्हाळ्यातली वाळवणाची कामं व्हायला हवीत म्हणून तिनं निगुतीनं तीन दिवस गहू भिजत घातले होते.ते निगुतीनं वाटून,हिंग-मीठ घालून त्याचा चीक शिजवला होता आणि आता शेवपात्रातून त्याच्या कुरडया पाडण्यात तिची सगळी सकाळ सत्कारणी लागली होती.उरलेल्या थोड्याच सत्वाच्या आता शेवटच्या कुरडया घालून झाल्या की जरा आराम करूया,भाजी पोळी सकाळीच करून ठेवलीये,त्यामुळे जेवून थोडीशी विश्रांती घेऊया."विचार करता करता गीताची नजर आभाळाकडे गेली.तिच्या बंगल्यातल्या गच्चीवरच्या मघा निरभ्र असलेल्या आकाशाच्या तुकड्यात काही चुकार ढग आलेले दिसत होते.तिचा नवरा,मुलं सकाळीच कामावर गेली होती.ते परतायच्या आत,कुरडया वाळल्या की तळून,सगळं साग्रसंगीत  स्वयंपाक-पाणी तिला करायचं होतं."खवय्याचं कुटुंब असल्यामुळे हे सगळे प्रकार करायला हुरूप येतो खरा!" ती स्वत:च्या मनाशीच समाधानानं हसली.  ...

मेट्रोतल्या बायका :लेख:३६)त्रिशंकु

मेट्रोतल्या बायका :लेख:३६)त्रिशंकु त्रिशंकु   -रश्मी घटवाई  शरयुचं विमान मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर उतरलं. सामानासह ती बाहेर आली,  तेव्हा ऐन दुपार असल्यामुळे महानगरात ऊन रणरणत होतं.बाहेर क्षणभर वावरणं सुद्धा कठीण होत होतं.उष्म्यानं जिवाची काहिली होत होती.त्यात हवेतल्या दमटपणामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या.आधीच  ठरवलेल्या  टॅक्सीत बसून आता तिला गोरेगावला मावसबहिणीकडे जायचं होतं. नद्या, पाणी या विषयावर आयोजित दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी म्हणून ती मुंबईत आली होती.याच विषयावर नुकतीच तिनं अमेरिकेतल्या नामवंत विद्यापिठातून डॉक्टरेट मिळवली होती आणि  जलविशेषज्ञ या नात्यानं  तिनं सिंगापूरमध्ये नुकतंच काम केलं होतं.ह्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी विशेष आमंत्रितांपैकी ती एक होती.दोन दिवसांनी परिषद सुरु होणार होती,पण जेट लॅग, जमलं तर पर्यटक म्ह्णून थोडंसं मुंबई दर्शन,आपल्या संस्कृतीचा शोध घेणं म्हणून तिनं दीड दिवस आधी मुंबईत पाऊल ठेवलं होतं. मुंबईतल्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा होत्या,माणसांची गर्दी हो...

मेट्रोतल्या बायका :लेख:३५)​​​​कोsह​​​​​म्

​​मेट्रोतल्या बायका :लेख:३५) कोsह​​​​​म् -रश्मी घटवाई  श्रुतीनं आपला मेकअप नीट असल्याची खात्री केली आणि ती बातम्या देण्यासाठी टीव्ही स्टुडियो मध्ये शिरली.इतक्या  टीव्ही चॅनेल्सच्या पसाऱ्यात आणि अगणित टीव्ही रिपोर्टर्स आणि न्यूज रीडर्सच्या गोतावळ्यात ही  श्रुतीनं अल्पावधीत न्यूज बघणाऱ्या लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं. अहंगंडाचा लवलेश नसलेलं पण आत्मविश्वास झळकणारं  श्रुतीचं  सोज्ज्वळ ,सुसंस्कृत व्यक्तिमत्व आणि स्वच्छ शब्दोच्चारण यानं तिनं लोकांना जिंकलं होतं.तिचा चाहतावर्ग ती सादर करीत असलेल्या प्राईमटाईम न्यूजसाठी दोन-चार मिनिटं आधीच टीव्हीच्या पुढ्यात येऊन बसलेला असतो,याची तिला जाणीव होती. स्टुडियोत बातम्या वाचत असतांना अगदी काहीही होऊ शकतं,आगंतुकपणे  स्टुडियोत  शिरून  न्यूज रीडरच्या पायात घोटाळलेलं मांजर,घोंघावणारी माशी वगैरे गोष्टी न्यूज रीडर इतक्याच  टीव्हीच्या  पुढ्यात बसलेल्या प्रेक्षकांना पण त्रास देतात, ह्या घटना पूर्वी घडल्याचं  तिनं  ऐकलं होतं.फार पूर्वी म्हणजे एकुलतं एक...

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख ३४)​​​​शेजारी

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख  ३४)​​​​शेजारी शेजारी  -रश्मी घटवाई  त्या उंच इमारतीकडे जातानाच आरतीचा जीव दडपला होता. तिचं  सगळं बालपण दिल्लीतल्या विस्तीर्ण आवार असलेल्या  प्रशस्त घरात गेलं होतं. दिल्लीत आता आतापर्यंत गगनचुंबी इमारती नव्हत्याच. बंगले,बैठी घरं ह्यांचं जिथे प्रस्थ होतं ,तिथे आता अनेकमजली इमारती उभ्या रहात होत्या. अधूनमधून फिरायला आईबाबांबरोबर ती मुंबईला गेली होती,तेव्हा तिथल्या अनेक मजली  उंच    इमारती   बघून तिला फार आश्चर्य वाटलं होतं आणि सगळ्यात वरच्या मजल्यावर रहाणाऱ्याला खाली वाकून पाहायचं झालं तर किती भीती वाटेल,याचा तिच्या बालमनाला विचार करतानासुद्धा खूप त्रास झाला होता. मुंबई तर बदलली होतीच; पण दिल्लीही  काही आता तिच्या लहानपणी होती तशी राहिली नव्हती. स्वतः आरतीसुध्दा लहानाची मोठी होऊन लग्न होऊन दोन मुलांची आई झाली होती.आयटी क्षेत्रात असलेल्या तिच्या  नवऱ्यानं नोकरी बदलल्यानं त्याच्या  कामाच्या ठिकाणी किंवा निदान जवळपास चांगला फ्लॅट भाड्यानं घेऊन राहता येईल,असा विचार करून आरती नवऱ्यासह ग्रेट...

मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख ३३)​​स्वातंत्र्य

 मेट्रो शहरे आणि स्त्री लेखमाला:लेख  ३३)​​स्वातंत्र्य स्वातंत्र्य - रश्मी घटवाई  "अहो,उठता ना?चहा गार होतोय तुमचा !बँकेत जायला  उशीर होईल अशानं!"गिरिजानं नेहेमीप्रमाणे धोरणानं चहाचं आधण ठेवून नवऱ्याला उठवायचा प्रयत्न केला .     "गिरिजा,माझ्या ब्रशवर टूथपेस्ट लावून दे ना !कंटाळा आलाय उठायचा,"नवऱ्यानं डोळे नं उघडताच तिला म्हटलं ,तसा गिरिजानं लगोलग सवयीनं आधीच  टूथपेस्ट लावून आणलेला नवऱ्याचा  टूथ ब्रश त्याच्या हातात ठेवला."अहो,मुलं बरी!वेळच्या वेळी उठून नाश्ते उरकून शाळेत सुद्धा गेलीत,कारण आज त्यांना त्यांचे वार्षिक परीक्षेचे पेपर्स दाखवणार आहेत.मुंबईसारख्या ठिकाणी तुमची बँक घराजवळ आहे,तिथे चालत जायला जेमतेम दोन मिनिटं लागतात म्हणून बरी गती आहे!उठा आता,नाहीतर ब्रॅन्च मॅनेजर वेळेवर पोहोचले नाहीत,तर बँक बंद पडेल!"  गिरिजानं  अखेरीस त्याला उठून बसायला भाग पाडलं आणि तो नीट दात घासतोय,याची खात्री पटल्यावर ती रोजच्याप्रमाणे त्याच्यासाठी चहा आणायला गेली."चहा घेऊन लगेच आंघोळीला जा!नाश्ता तयार ठेवते. आणि हो!मला जरा शंभ...